नागपुर जिल्हा परिषद विषयी

 

  • • आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.
  • • बलवंतराय मेहता समितीने ग्रामिण विकासात ग्रामिण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरिय पंचायत राज पद्धतीची शिफारस केली आहे.
  • • त्याला अनुसरून महाराष्ट्र शासनाने 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रितीने त्रिस्तरिय पंचायत राज ची स्थापना केली
  • • स्व. यंशवतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मे 1962 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेची स्थापना झाली. श्री छ्त्रपाल आनंदराव केदार यांना नागपूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. त्यानी दि. 12.08.1962 ते 11.08.1967 पर्यंत जिल्हा पारिषदेचे अध्यक्ष पद भुषविले. तेव्हापासुन आज अखेर जिल्हा परिषद नागपूर मध्ये 22 अध्यक्षांनी हे पद भुषविलेले आहे. सध्या मा. सौ. निशाताई टेकचंद सावरकर या जिल्हा परिषद नागपूर चे अध्यक्ष पद भुषवत आहेत.
  • • जिल्हा परिषद नागपूर मध्ये 13 पंचायत समित्या व 770 ग्राम पंचायती ग्रामिण विकासासाठी कार्यरत असुन त्यामधे 1872 गावे आहेत. शासनाच्या कोणत्याही योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात जिल्हा परिषद नागपूर नेहमीच अग्रेसर राहलेली  आहे.
  • जिल्हा परिषदेचा उद्देश केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांचे द्वारे ग्रामीण क्षेत्राचे विकासाकरिता येणा-या योजनांची अंमबजावणी करणे व त्या योजनांवर देखरेख ठेवणे. तसेच ग्रामस्थांपर्यंत या योजना पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचे मार्फत पोहोचविणे व ग्रामीण क्षेत्रात विकासाचे उद्दिष्ठ गाठून ग्रामीण क्षेत्राच्या सर्वंकष विकास करणे  

जिल्हा परिषद नागपुरचे सन्माननिय अध्यक्ष पद भुषविलेल्या पदाधिकारी याची यादी ख़ालील प्रमाणे.

अ.क्र.

मा. अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर यांचे नाव

कालावधी

पासुन

पर्यंत

1 मा.श्री छत्रपाल आनंदराव केदार 12.08.1962 11.08.1967
2 मा.श्री बळीराम दामुसाव दखने (प्र) 12.08.1967 27.03.1968
3 मा.श्री छत्रपाल आनंदराव केदार 28.03.1968 30.10.1975
4 मा.श्री प्रभाकर माधवराव किनखेडे 31.10.1975 05.03.1979
5 मा.श्री दे.ज. कुंभलकर (प्र) 06.03.1979 19.06.1979
6 मा.श्री रणजीत अरविंद देशमुख 20.06.1979 24.06.1985
7 मा.श्री वि.अ‍. टालाटुले 25.06.1985 20.03.1992
8 मा.श्री पांडुरंग दौलत मते 21.03.1992 23.04.1992
9 मा.श्री सदानंद चंद्रभान निमकर (प्र) 24.04.1992 06.07.1992
10 मा.श्री अनिल देशमुख 07.07.1992 20.08.1995
11 मा.श्री अ‍शोक पंजाबराव धोटे 21.08.1995 20.03.1997
12 मा.श्रीमती रत्नमाला सुभाष पाटील 21.03.1997 08.12.1997
13 मा.श्री बंडोपंत बापूराव उमरकर (प्र) 09.12.1997 04.03.1998
14 मा.श्रीमती रत्नमाला सुभाष पाटील 05.03.1998 20.03.1998
15 मा.श्री पुरुषोत्तम मधुकर डाखोळे 21.03.1998 20.03.1999
16 मा.श्रीमती सुमन दमोधर बावनकुळे 21.03.1999 20.03.2001
17 मा.सौ. सुनिता रमेश गावंडे 21.03.2001 17.02.2005
18 मा.श्री शामदेव झिंगरूजी राऊत 18.02.2005 21.03.2007
19 मा.श्री रमेश नारायण मानकर 22.03.2007 01.12.2009
20 मा.श्री सुरेश यादवराव भोयर 02.12.2009 20.03.2012
21 मा.सौ. संध्या अशोकराव गोतमारे 21.03.2012 20.09.2014
22 मा.सौ. नीशा टेकचंद सावरकर 21.09.2014