खाते प्रमुखाचे पदनाम | मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी |
खाते प्रमुखाचे नाव | श्रीमती.कुमदिनी हाडोळे |
विभागाचा दूरध्वनी क्रमांक | 0712-2565046 |
विभागाचा ईमेल | zpngpfinance1@gmail.com |
अ.क्र.
१ |
पदनाम
मुख्य लेखा व वित्त अधिकारी |
पदाची कर्तव्ये
१. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायात समित्या अधिनियम,
१९६१ व महाराष्ट्र जिल्हा परिषदा पंचायात समिती लेखा
संहीत, १९६८ मध्ये विहित केल्याप्रमाणे तसेच शासनाने
वेळोवेळी दिलेल्य आदेशानुसार व कर्तव्य. |
अ.क्र.
२ |
पदनाम
उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी (जुने पदनाम वरिष्ठ लेखाधिकारी) |
पदाची कर्तव्ये
१) आस्थापना. १.१) वित्त विभागाचे आहरण व संवितरण अधिकारी म्हणून काम पाहणे. ( वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते प्रवास भत्ते व इतर वैयक्तिक प्रदाने इत्यादी ) १.२) जिल्हा परिषद वित्त विभागाचे आस्थापना विषयक प्रकरणे नस्त्या/ प्रकरणे तपासून(सर्व) अभिप्राय देणे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी याना सादर करणे. (सर्व प्रकारच्या रजा, वेतनवाढ , सेवापुस्तक ) १.३) आवक जावक शाखा- विभागाची येणारे टपाल सहाय्यक लेखाधिकारी हे लेखा अधिकारी यांना सादर करतील व लेखा अधिकारी हे उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांचे मार्फत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करतील. १.४) रोखशाखा- रु.२,००,०००/- च्या आतील देयके पारित करणे व त्याचे धनादेश अदा करणे. (कामांच्या व खरेदीच्या संदर्भांत रु.२,००,०००/- च्या आतील अंतिम देयके तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.) २) निवृत्तीवेतन -निवृत्तीवेतन, भविष्य निर्वाह निधी, गट विमा योजना संबंधित प्रकरणांना मंजुरी देणे (पूर्ण अधिकारी वर्ग-३ व वर्ग -४ कर्मचाऱ्यांच्या प्रकरणाबाबत ) व परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन (दि.स. पी.एस)(येन पी एस ) योजनांचे लेखे तयार करणे व प्रकरणे तपासून मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे. ३) संकलन- जिल्हा परिषद लेखा विषयक सर्व जबाबदारी वार्षिक लेखा वेळेत होतील यावर नियंत्रण. ४)अर्थसंकल्प – जिल्हा परिषद स्वतःचे उत्पन्न व शासनाचे विविध योजना अर्थसंकल्प तयार करण्यासाठी मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सहाय्या करणे. ५) देयक व नस्ती -पूर्व लेखा परीक्षण -सामान्य प्रशासन विभाग, ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, वित्त,बांधकाम विभाग या विभागाच्या संबंधित |
अ.क्र.
३ |
पदनाम
लेखाधिकारी-१ |
पदाची कर्तव्ये
1) अर्थसंकल्प: १.५) अर्थ संकल्पिय मंजूर तरतुदींचे पंचायत समित्यांना वाटप प्रस्तावित करणे. १.६) केंद्रीय वित्त आयोग व महाराष्ट्र राज्य वित्त आयोग यांच्याशी संबंधित माहिती संकलित करून सादर करणे. १.७) अर्थसंकल्पाशी संबंधित व उपरोक्त विषयाबाबत सर्व नोंद वह्या अद्ययावत ठेवणे. नियतकालिक अहवाल सादर करणे व सर्व प्रकारचा परत व्यवहार करणे. १.८) आहरण केलेल्या रक्कमांचा महालेखापाल कार्यालयाच्या लेख्यांशी तालमेल घालणे व तालमेलाचा अहवाल सादर करणे. २. संकलन :- २.१) सर्व विभागाच्या लेखाशीर्षाचे जमा व खर्चाचे लेखे ठेवणे. २.२) पंचायत समित्यांचे लेखे स्वीकारणे, तपासणे व संकलन करणे. २.३) मासिक खर्च विवरण पत्र तयार करून विहित दिनांकास सादर करणे. २.४) वार्षिक लेखे तयार करणे व सादर करणे. २.५) अर्थसंकनकल्पिय तरतुदीपेक्षा कमी अथवा अधिक झालेल्या खर्चाचे विवरणपत्र तयार करून सक्षम प्राधिकाऱ्यास सादर करणे. २.६)अनुदान निर्धारण-मंजूर आर्थिक तरतूद खर्च प्रमाणित करून देणे. २.७) उपयोगिता प्रमाणपत्र – मंजूर आर्थिक तरतूद व खर्च प्रमाणित करून देणे. २.८) जिल्हा परिषदेस शासनाकडून येणे व शासनास देणे असलेल्या रक्कमांची माहित काढून सादर करणे. २.९) खाते प्रमुखाकडील नोंद वह्यांची पंचायत समितीच्या खर्चासह लेखाशीर्षनिहाय खर्चाचा दरमहा ताळमेळ घालणे. २.१०) खर्चाचे मासिक/त्रैमासिक व वार्षिक विवरणपत्रे शासनाच्या संबंधित नियंत्रक अधिकाऱ्यांना वेळेवर सादर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे. ३) सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी :- जिल्हा परिषदांच्या वर्ग-३ व वर्ग-४ कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे काम पाहणे, लेखे ठेवणे, मंजुरी व अदाइचे प्रकरणे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी ह्यांना सादर करणे. ठेव संलग्न विमा योजनेचे देयके तपासणे व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे.
४) परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना- ५) देयक व नस्ती – पूर्व लेखा परीक्षण – कृषी विभाग, समाजकल्याण(अपंग कल्याणसह) महिला व बाल कल्याण विभाग(एकात्मिक बाल विकासासह) व लघु पाटबंधारे विभाग व या विभाग संबंधित नस्त्यांचे पूर्वलेखा परीक्षण करणे व अभिप्राय देऊन मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे व रु. २,००,०००/- वरील देयके/प्रकरणे मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे. ६) कर्जे: व्याजी, बिनव्याजी कर्जे मंजुरीसाठी प्रकरणे सादर करणे, लेखे ठेवणे, व्याजाची गणना करणे व मसुलीवर नियंत्रण ठेवणे. ७)अग्रिमे : मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना व विभागांना दिलेल्या सर्व प्रकारच्या अग्रीमांच्या वसुलीवर नियंत्रण ठेवणे व विभागाच्या नोंदवह्यांशी ताळमेळ घेणे. ८)ठेवी : जिल्हा निधीत जमा होणाऱ्या सर्व विभागाची ठेवींचा हिशोब ठेवणे , ठेव परतावा ठेवी व्यपगत करणे, महसूल खाती जमा रक्कमांचा परतावा, अग्रीम व त्याचे विवरण उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना सादर करणे. ९)वित्त विभागाची रोखशाखा – वित्त विभागाची ठेवण्यात येणाऱ्या सामान्य कीर्दी – ९.१) हस्तांतरित योजना ९.२)अभिकरण योजना ९.३) जिल्हा परिषदेचे स्वतःचे उत्पन्न ९.४)ग्रामीण पाणीपुरवठा देखभाल व दुरुस्ती नीधी ९.५) घसारा नीधी ९.६)अल्पबचत प्रोत्साहनपर अनुदान ९.७)आश्र्वासित रोजगार इत्यादी रोख पुस्तके अद्यावत ठेवणे, जमा व खर्च बाजूच्या नोंदी तपासून आवश्यक त्या नोंदी साक्षांकित करणे, बँक ताळमेळ करणे,कीर्दी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर करणे.ताळमेळात तफावत आढळल्यास शोधून दूर करणे. १०) लेखा आक्षेपाचे निराकरण – अर्थ विभागाची अहवाल, महालेखापालाचे निरीक्षण अहवाल आणि आयुक्त यांचे तपासणी अहवाल यातील लेखाआक्षेपाचे संबंधित शाखेकडून अनुपालन तयार करून घेणे . ११) सोपविण्यात आलेल्या विभागाची योजना, अर्थसंकल्प व अडचणी इत्यातीबाबद समन्वयक म्हणून काम करणे व याबाबतची माहिती उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देणे. १२) मुख्य लेखा व वित्त अधिकारी व उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी यांनी सोपविलेली इतर कामे व आदेशाचे पालन करणे. १३)सभा व बैठक उपस्थिती – १३.१) अर्थ समितीची सर्व बैठकांना उपस्थित राहणे. १३.२) अनुक्रमांक ५ मध्ये सोपविण्यात आलेल्या विभागांच्या विषय समितीच्या सभेचा वृत्तांत मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांना देणे. |
अ.क्र. | धारण केलेले पद | पुरविली जाणारी सेवा | पूर्तता करण्यास लागणारा कालावधी | सेवा विहित कालावधीत पुरविली व गेल्यास ज्याचे कडे तक्रार करता येईल तो अधिकारी |
1 | मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर | विभागाकडून प्राप्त नस्त्या व देयाकांना मंजुरी / शिफारस करणे | सात दिवस | मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नागपूर |
2 | उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी वर्ग -१ | सेवा निवृत्ती वेतन प्रकरणास मंजुरी देणे भ.नि.निधी परतावा न परतावा देयाकांना मंजुरी देणे | १ महिना १५ दिवस | मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर |
3 | लेखाधिकारी 1 वर्ग -2 | स.ले.अ. कडून आलेली शिक्षण लघुसिंचन, मा.ब.क., पशुसंवर्धन, आरोग्य, कृषी विभाग संबंधी देयके प्रकरणे | सात दिवस | मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर |
4 | लेखाधिकारी 2 वर्ग -2 | स.ले.अ. कडून आलेली बांधकाम पंचायत समाजकल्याण साप्रवि, भ.नि.निधी, वेतन निश्चिती इ. योजने संबंधी देयके | सात दिवस | मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा परिषद, नागपूर |