- मुंबई ग्रामपचायत अधिनियम 1958 चे कलम 133 अन्वये जिल्हा ग्राम विकास निधी स्थापन केलेला आहे. मुंबई ग्रामपचायत अधिनियम 1958 चे कलम 62 (3) मध्ये तरतुद केल्याप्रमाणे प्रत्येक पंचायतीला दरवर्षी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे 0.25% पावेतो रक्कमेचे अनुदान या कलमाखाली स्थापन केलेल्या जिल्हा ग्राम विकास निधीत द्यावे लागते. या निधीची रक्कम गट विकास अधिकारी, पंचायत समिती तर्फे चेक व्दारे जिल्हा परिषदेला प्राप्त होते.
- अशा रितीने जमा झालेली निधीची रक्कम स्थायी समितीत विहित होते. ती रक्कम मुंबई जिल्हा (ग्राम विकास निधीबाबत) नियम 1960 अन्वये नियम 5 मध्ये दिल्याप्रमाणे बँकेत ठेवली पाहीजे. निधीस दिलेल्या अंशदानाच्या रक्कमेवर पंचायतीला द.सा.द.शे.रू.2.5 (अडीच) टक्के दराने व्याज मिळते. जमा झालेल्या निधीच्या रक्कमेतुन ग्राम पंचायतीला कर्ज मिळते. कर्जासाठी स्थायी समितीकडे अर्ज करावा लागतो. नियम 10 त्यात नमुद केलेली माहिती व पंचायतीचे कर्जाचे अर्जात द्यावी लागते. स्थायी समितीला रू.30,000/- पर्यंत ग्रामपंचायतीला कर्ज देता येते. त्यापेक्षा जास्त रकमेचे कर्जाला जिल्हा परिषदेची पुर्व मंजूरी लागते. कर्जाची परतफेड हप्त्याने करता येते. कर्जावर द.सा.द.शे.5% दराने व्याज द्यावे लागते. स्थायी समितीला नियमाचे परिशिष्टात दिलेल्या नमुन्यात हिशोब ठेवावे लागते.
“ जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत ग्रामपंचायतीला जन सुविधासाठी विशेष अनुदान “(लेखाशिर्ष -2515 1793)
योजनेचे उद्दीष्ट :-
ही जिल्हा स्तरीय योजना असुन सन 2010-11 पासुन सुरु झालेली आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतींना दहनदफन भुमीकरीता जमीनीची आवश्यकता असल्यास जमीन खरेदी करण्यास निधी उपलब्ध करुन देणे, दहनदफन विकासाकरीता खालील सुविधा उपलब्ध करुन देणेकरीता रू 10.00 लाख व ज्या ग्रामपंचायतींकडे स्वता:च्या मालकीचे ग्रामपंचायत भवन उपलब्ध नाही अश्या ग्रामपंचायतींना ग्रामपंचायत भवनाकरीता रू 12.00 लाख निधी उपलब्ध करुन देता येतो.
योजना राबविणारी यंत्रणा :-
जिल्हा नियोजन समिती, नागपूर योजना अंतर्गत घेण्यात येणारी कामे :-
अ) ग्रामीण भागात दहन/दफन भुमीची व्यवस्था करणे त्या सुस्थीतीत ठेवणे व त्याचे नियमन करणे यासाठी स्मशानभुमीवर हाती घ्यावयाची कामे.
1) दहन/दफन भुसंपादन
2) चबुत-याचे बांधकाम
3) शेडचे बांधकाम
4) पोहोच रस्ता
5) गरजेनुसार कुंपण वा भिंती घालुन जागेची सुुरक्षितता साधने
6) दहन/दफन भुमीत विद्युतीकरण व आवश्यकतेनुसार विद्युत दाहीनी/सुधारीत शवदाहीनी व्यवस्था
7) पाण्याची सोय
8) स्मृती उद्यान
9) स्मशान घाट/नदी घाट बांधकाम
10) जमीन सपाटीकरण व तळ फरशी.
ब) ग्रामपंचायत भवन/कार्यालय याबाबत हाती घ्यावयाची कामे.
1) नविन ग्रामपंचायत इमारत बांधकाम व इमारती अंतर्गत सुविधा
2) जुन्या ग्रामपंचायत इमारतीची पुर्नबांधणी/विस्तार
3) ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये वृक्षारोपण, परिसर सुधारणा ,परिसराला कुंपन घालणे व इतर कामे
.
” जिल्हा वार्षिक योजनाअंतर्गत मोठया ग्रामपंचायतीला नागरी सुविधासाठी विशेष अनुदान ” (लेखाशिर्ष -2515 1801)
शासन निर्णय :- महाराष्ट्र शासन ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्र. ददभु 2610/प्र.क्र.129/पंरा-4/ दिनांक 16.9.2012
योजना राबविणारी यंत्रणा :- जिल्हा नियोजन समिती, नागपूर योजना सुरु झाल्याचे वर्ष :- 2011-12
योजनेचे उद्दीष्ट :- सन 2011 चे गानगणने नुसार 5000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींचा आर्थीक, सामाजीक, सांस्कृतीक, औद्योगीक , वाणिज्यिक विकास करण्यासाठी खालील बाबीकरीता एका वर्षात कमाल रुपये 50.00 लाखापर्यत व 5 वर्षाच्य प्रकल्प काळात एकुण रुपये 2.00 कोटी लाभ देता येतो.
निधी उपलब्धतेचे निकष :- या योजने अंतर्गत 90 % शासन अनुदान उपलब्ध करुन दिल्या जात असुन उर्वरीत 10 टक्के निधी ग्रामपंचायतीला स्वनिधी मधुन खर्च करावयाचा आहे.
योजना अंतर्गत घेण्यात येणारी कामे :- कामनिहाय अनुदान मर्यादा
1) ग्रामपंचायतीचा/गावाचा नियोजाबद्ध विकास – कमाल 10 लाख
2) बाजारपेठ विकास – कमाल 25 लाख
3) सार्वजनिक दिवाबत्तीची सोय – कमाल 10 लाख
4) बागबगीचे,उद्याने तयार करणे – कमाल 15 लाख
5) अभ्यास केंद्र – कमाल 7 लाख
6) गावाअंतर्गत रस्ते करणे – नमुद नाही
7) सांडपाणी व्यवस्थापनासाठी भुमीगत नाली बांधकाम – नमुद नाही
8) ग्राम सचिवालय बांधकाम व छोट्या ओढ्यावर साकव / घट बांधणे.
• जमीन महसुलावरील विविध उपकर अनुदाने (लेखाशिर्ष -36040479)
योजनेचे उद्दीष्ट :- जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वसुल करण्यात येणाऱ्या शेत जमीन महसुलातुन जिल्हयाचा ग्रामीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषदांना खालील सहाय्यक अनुदाने उपलब्ध करुन देणे. सदर अनुदानांची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे केली जाते.
1) जिल्हा परिषद सामान्य उपकर अनुदान :- जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 144 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 1 रुपया जमीन महसुलावर 2 रु. जिल्हा परिषद सामान्य उपकर वसुल केल्या जातो व त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेला सामान्य उपकर अनुदान प्राप्त होत असते.
2) जिल्हा परिषद/पंचायत समिती वाढिव उपकर अनुदाने :- जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 155 (1) (6) अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 1 रुपया जमीन महसुलावर 5 रु. वाढिव उपकर वसुल केल्या जातो व त्याअनुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना वाढिव उपकर प्राप्त होत असते.
3) वाढिव उपकरावर स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान :- जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 185 अन्वये जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत 5 रुपया वाढिव उपकरावर 8 रु. या प्रमाणात जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शासनाकडे मागणी नोंदविल्या जाते व त्याअनुषंगाने जिल्हा परिषदेला स्थानिक उपकर सापेक्ष अनुदान प्राप्त होत असते.
योजनेचे नाव :- अनुसुचित जमाती व इतर पारंपारीक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम, 2006 व नियम 2008
योजनेचे उद्दीष्ट :- वने वन्यजिवन व जैवविविधता या संसाधनाची सातत्यता टिकवुन ठेवुन पात्र वनहक्क धारकांचे उत्पन्नात वाढ करुन व त्यांचे राहाणीमान उंचावने करीता वननिवासी ,अनुसुचित जमाती किंवा इतर पारंपारीक वननिवासी यांनी वस्ती करण्यासाठी किंवा स्वता:च्या उपजिविकेकरीता शेती करण्यासाठी वैयक्तीक किंवा सामायिक व्यवसाय म्हणुन वन जमीन धारण केलेली असेल अश्या वनहक्क धारकांना त्या व्यक्तीच्या किंवा कुटुंबाच्या किंवा समाजाच्या भेागवटयाखाली असेल आणि ती प्रत्यक्ष भोगवटयासाठी असलेल्या क्षेत्रापुरती मर्यादीत असेल आणि कोणत्याही परिस्थितीत 4 हेक्टरपेक्षा अधिक असणार नाही इतकी जमीन वनहक्क धारकांना उपलब्ध करुन देणे.
योजना राबविणारी यंत्रणा :- जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद व वनविभाग . हि योजना नागपूर जिल्हयात सन 2008-09 पासुन अंमलात आलेली आहे. हि योजना राबविण्यासाठी जिल्हास्तरीय समिती, तालुकास्तरीय समिती व ग्राम स्तरीय वनसमिती स्थापन करण्यात आलेल्या आहेत. जिल्हास्तरीय समितीमध्ये मा. जिल्हाधिकारी अध्यक्ष असुन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, वनसंरक्षक, प्रकल्प अधिकारी उपविभागीय अधिकारी हे शासकीय सदस्य असुन यामध्ये तीन अनुसुचीत जमातीचे अशासकीय सदस्य नेमण्यात आलेले आहे. उपजिल्हाधिकारी (महसुल) हे सदस्य सचिव आहेत.
योजनेची माहिती :- नागपुर जिल्हयात सदर कायदयाची अंमलबजावणी करण्याकरीता एकुण ग्रामपंचायत स्तरावर 502 वनसमित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या वनसमीत्यांमार्फत सादर करण्यात आलेल्या एकुण 2190 व्यैयक्तीक 86 सामुहिक प्रकरणे दाखल केलेली असुन त्यापैकी पात्र असलेली 436 वैयक्तीक व 72 सामुहिक प्रकरणे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निकाली काढलेली आहेत.
या योजनेअंतर्गत वनअधिनियम 2006 मधील कलम 3(2) मधील तरतुदीनुसार सामुहिक दाव्याअंतर्गत खालील प्रत्येक बाबीकरीता 1 हेक्टरपेक्षा कमी असेल इतकी वनजमीन उपलब्ध करुन दिल्या जाते.
1) शाळा
2) दवाखाना किंवा रुग्णालय
3) अंगणवाडी
4) स्वस्त धान्य दुकाने
5) विद्युत व दुरसंदेशवाहक तारा
6) पाण्याच्या टाक्या किंवा अन्य गौण जलाशये
7) पिण्याचे पाणीपुरवठा व जलवाहिण्या
8) पाणी किंवा पावसाच्या पाण्यावरील शेतीची संरचना
9) लहान सिंचन कालवे
10) अपारंपारीक उर्जा साधने
11) कौशल्यामध्ये वाढ करणारी किंवा व्यवसाय प्रशिक्षण केंद्र
12) रस्ते
13) सामाजिक केंद्र
विषय :- चौदावा केंद्रिय वित्त आयोगांतर्गत निधीच्या विनियोगाबाबत
चौदाव्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना केवळ ग्रामपंचायत स्तराकरीता जनरल बेसिक ग्रँटच्या पहिल्या हप्त्याचे वितरणांतर्गत सन 2015-16 या आर्थिक वर्षात एकुण रू.20,06,41,000/- अनुदान प्राप्त झाले आहे. त्यापैकी ग्रामीण लोकसंख्येच्या प्रमाणात 90 टक्के रू.17,50,18,000/- व ग्रामीण क्षेत्रफळाच्या प्रमाणात 10 टक्के रू.2,56,23,000/- अनुदान वितरण करावयाचे आहे.
त्याचप्रमाणे जनरल बेसिक ग्रँटच्या दुस-या हप्त्याचे वितरणांतर्गत सन 2015-16 या आर्थिक वर्षात एकुण रू.20,06,41,000/- अनुदान प्राप्त झाले आहे. तेसुध्दा वरीलप्रमाणे ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करावयाचे आहे.अश्याप्रकारे दोही हप्त्यांचा मिळुण एकुण निधी 40,12,82,000/- ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करण्यात करण्यात आलेला आहे. चौदाव्या वित्त आयोगांतर्गत नागपूर जिल्हा परिषदेचे खाते असलेल्या पंजाब नॅशनल बँक, सिव्हिल लाईस,नागपूर येथे कार्यालयीन पत्र दिनांक 31/12/2015 अन्वये एकुण 769 ग्रामपंचायतीचे खात्यावर इसीएस/आरटीजीएस करणेकरीता पाठविण्यात आलेले असुन 769 ग्रामपंचायतीच्या खात्यात उपरोक्त निधी जमा झालेला आहे.
तसेच वरील रू.40,12,82,000/- या जमा रक्कमेवर बँकेकडून व्याजाची रक्कम रू.31,03,413/- प्राप्त झालेली असुन सदर रक्कम कार्यालयीन पत्र क्र.1062/16 दिनांक 18/3/2016 अन्वये एकुण 769 ग्रामपंचायतीचे खात्यावर इसीएस/आरटीजीएस करणेकरीता पाठविण्यात आलेले असुन 769 ग्रामपंचायतीच्या खात्यात उपरोक्त निधी जमा झालेला आहे.
वरीलप्रमाणे 14 व्या वित्त आयोगांतर्गत जनरल बेसिक ग्रँटच्या (सन-2015-16) पहिला व दुसरा हप्ता तसेच व्याजाची रक्कम मिळुण एकुण निधी रु.40,43,85,413/- चे वितरण शासन निकषानुसार 769 ग्रामपंचायतींना करण्यात आलेले असुन सर्व ग्रामंपचायतींच्या खात्यांवर निधी जमा झालेला आहे.
शासन निर्णय 21 डिसेंबर 2015 नुसार चौदाव्या केंद्रिय वित्त आयोगांतर्गत पहिल्या आर्थिक वर्षाच्या (सन 2015-16) निधीतुन ग्रामपंचायतींनी घ्यावयाची कामे पुढीलप्रमाणे आहेत.
(अ) ग्रामपंचायतींनी प्राप्त होणा-या 100 टक्के अनुदानापैकी 10 टक्के निधी प्रशासकीय व तांत्रिक स्वरूपाच्या खर्चाच्या बाबीसाठी स्वतंत्र राखून ठेवावयाचा आहे.उर्वरीत 90 टक्के निधीचा विनियोग ग्रामपंचायतींनी खालीलप्रमाणे पायाभूत सुविधा प्रकल्पावर खर्च करावयाचा आहे.
1)पिण्याचे पाणी संदर्भातील बाबी.
2)स्वच्छतेशी संबंधित बाबी.
3)ग्रामपंचायत भवन व अंगणवाडी बांधकाम.
4)दिवाबत्ती व सौरदिवांचा वापर संदर्भातील बाबी.
5)आवश्यक देखभाल व दुरूस्तीशी संबंधित बाबी.
टिप :- उघडया पध्दतीच्या गटाराकरीता या निधीतुन खर्च करता येणार नाही.
शासन पत्र क्र.चौविआ-2015/प्र.क्र.26/वित्त-4 दिनांक 23 डिसेंबर 2015 नुसार चौदाव्या वित्त आयोगांतर्गत पहिल्या वर्षाच्या निधीतुन ग्रामपंचायतींनी घ्यावयाच्या कामासाठी अनुसरावयाच्या कार्यपध्दतीबाबत वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.
अ. क्र. |
करावयाची कार्यवाही |
कार्यवाही पुर्ण करण्चा अंतिम दिनांक |
कार्यवाही पुर्ण करण्यासाठी जबाबदार अधिकारी/कर्मचारी |
1 |
ग्रामपंचातीकडून करावयाच्या कामांच्या सूचीचा ग्रामपंचायतीने ठराव करणे व प्रस्तुत सूची तालुकास्तरीय समितीकडे छाननीसाठी सादर करणे |
5 जानेवारी 2016 |
ग्रामसेवक/ग्रामविकास अधिकारी |
2 |
ग्रामपंचातीनी सुचविलेली कामे तालुकास्तरीय समितीकडुन छाननी करून शिफारशीसह कामाची यादी ग्रामपंचायतीकडे पाठविणे |
15 जानेवारी 2016 |
संबंधित तालुक्याचे गट विकास अधिकारी |
3 |
प्रस्तुत यादी ग्रामसभेपुढे ठेऊन करावयांच्या कामांच्या यादीस ग्राम सभेची मान्यता घेऊन अंतिम ठराव करणे |
26 जानेवारी 2016 |
ग्रामसेवक /ग्रामविकास अधिकारी |