ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

NAGPURZP    23-Apr-2020
Total Views |
विभाग प्रमुखाचे नाव श्री उमल चांदेकर 
विभाग प्रमुखाचे पदनाम कार्यकारी अभियंता (ग्रामिण पाणी पुरवठा)
विभागाचा दुरध्वनी क्रमांक 0712-2561785
विभागाचा इ-मेल [email protected]

73 व्या घटना दुरूस्तीप्रमाणे ग्रामीण भागातील विविध पायाभूत प्रश्नांची उकल करण्यासाठी पंचायतराज संघटना सक्षमीकरणावर भर देण्यात आला आहे. कुठलाही कार्यक्रम राबवितांना ग्रामीण भागातील जनतेचा सक्रिय सहभाग विचारात घेऊन कार्यप्रणाली अवलंबवायाची आहे. या बाबतीत महाराष्ट्र शासनाने पाणी पुरवठा विषयक धोरणात दिनांक 27 जुलै 2000 च्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकसहभागावर आधारित, मागणी आधारित पाणी पुरवठा धोरण अवलंबविले आहे. या धोरणाप्रमाणे केंद्र शासन पुरस्कृत वर्धित वेग कार्यक्रम, राज्य शासन पुरूस्कृत, किमान गरजा कार्यक्रम, हे सर्व कार्यक्रम वर्ष 2005 ते 2009 या कालावधीत केद्र पुरूस्कृत भारत – निर्माण कार्यक्रमात एकत्रित करून सदर धोरणांची अमलबजावणी करण्यात आली आहे. वर्ष 2009-10 पासून केंद्र शासनाने ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरू केला आहे. सदर कार्यक्रमाचे उदिष्ट व व्हिजन खालीलप्रमाणे आहे.
 
राष्ट्रीय उद्दिष्ट :- प्रत्येक व्यक्तीस पेयजलाची किमान गुणवत्ता राखून पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी व इतर मुलभूत गरजांसाठी सातत्याने, नित्यनेमाने व सर्वपरिस्थीतीत सुलभरित्या, पुरेसे व सुरक्षित पाणी उपलब्ध करून देणे.
 
व्हीजन :- ग्रामीण भारतात सदैव सुरक्षित व शाश्वत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे
भूजल अधिनियमानुसार भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने पर्जन्यमान व निरीक्षण विहीरीतील भूजल पातळीच्या अभ्यासावरून संभाव्य पाणी टंचाई अहवाल तयार करून मा. जिल्हाधिकारी यांना संभाव्य पाणी टंचाई क्षेत्र घोषित करण्यासाठी सादर करणे 3 फेबुवारी 1999 च्या शासन निर्णयाप्रमाणे तसेच 27 फेब्रूवारी 2008 व 25 आक्टोबर 2008 च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व ग्राम पंचायतीने गावातील परिस्थितीचा अभ्यास करून पाणी टंचाई आहे किंवा कसे याबाबत ठराव सादर करणे सदर ठरावात पाणी टंचाई निवारणार्थ उपाययोजना प्रस्तावित करणे तसेच पुढील काळात पाणी टंचाई भासू नये याकरिता प्रतिबंधक उपाययोजना म्हणून शिवकालीन पाणी साठवण योजना व महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेन्तर्गत उपयुक्त कामे प्रस्तावित करणे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग,जि.प. मार्फत सदर ठरावाची छाननी करून कालावधी निहाय,गावनिहाय, उपाययोजना निहाय संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार करणे. संभाव्य पाणी टंचाई आराखडयास मा. जिल्हाधिकारी यांची मंजूरी घेणे.आराखडयातील समाविष्ट गावांचे भूवैज्ञानिक मार्फत सर्वेक्षण करून प्रपत्र ब मध्ये केलेल्या शिफारिशी प्रमाणे मा. जिल्हाधिकारी यांची प्रशासकीय मंजूरी घेण्यात येते. मा. जिल्हाधिकारी यांचे कडून प्रशासकीय मंजूरी मिळाल्यानतर उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येते.
 
दलीत वस्ती :- शासनाच्या नियमित कार्यक्रमातंर्गत पिण्याच्या पाण्याच्या सुविधा व शौचालये उपलब्ध करुन देण्यासाठी येाजना घेण्यात आल्या असल्या तरीही, या सुविधा राज्यातील अनुसुचीत जाती व नवबौध्दाच्या वस्त्यांमध्ये पर्याप्त प्रमाणात उपलब्ध झालेल्या नाहीत. या बाबींचा विचार करुन, राज्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, ग्रामीण भागातील अनुसुचीत जाती व नवबौध्द घटकांमधील कुटुंबांना खाजगी नळजोडण्या व वौयक्तिक शौचालये उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचारधीनी होती.त्यानुसार कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
 
कार्यकारी अभियंता,
ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, नागपूर
अ.क्र. तालुका ग्राम पंचायत गावांची संख्या वाड्या /वस्तीची संख्या कुटुंब संख्या ऐकून लोकसंख्या वैयक्तिक नळ जोडण्याची संख्या कायम नळ योजना संख्या कायम पाणी पुरवठा असल्येल्या कुटुंबाची संख्या अपेक्षित पाणी पटटी कर (रु.लक्षात) वसुली (रु.लक्षात) एकूण खर्च नळ कोंडयाळाची संख्या
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14
1 भिवापूर 56 109 109 19362 67950 7395 94 18756 52.819 28.90 47.82 527
2 हिंगणा 55 127 134 41580 207905 145007 111 32094 132.420 101.17 119.06 746
3 कळमेश्वर 51 95 97 20561 85381 13379 81 20139 94661 43.02 692.65 504
4 कामठी 47 75 75 23514 116534 11130 73 23468 78.978 71.35 66.65 534
5 काटोल 83 167 167 27669 120075 12281 150 27231 78.215 43.96 138.50 624
6 कुही 60 155 155 30972 114822 10177 128 27306 72.695 48.25 82.97 728
7 मौदा 63 120 120 62268 126537 9535 103 56928 68.007 45.56 151.77 631
8 नागपूर 69 138 140 73181 187342 19293 124 64605 136.641 95.69 94.21 795
9 नरखेड 70 132 132 27269 120034 17159 117 27185 121.359 48.29 100.32 623
10 पारशिवनी 52 109 112 32140 89196 14106 93 31486 99.616 72.98 124.56 437
11 रामटेक 46 141 152 27097 142388 8179 120 25076 57.543 31.31 82.30 145
12 सावनेर 75 128 128 40806 184768 19406 117 40586 137.308 103.35 281.32 738
13 उमरेड 74 139 139 23069 100687 8633 118 22510 61.457 41.65 92.93 513
  13 774 1635 1660 449488 1600661 169377 1429 417379 1200.719 775.48 2075.06 7545
सेवा जेष्ठता यादी २०२१ नुसार कालबध्द पदोन्नतीचा लाभ प्रदान करण्यात आलेल्या कर्मा-यांची यादी.
 
सर्वसाधारण स्थानांतरण 2019 download करण्याकरिता खालील लिंक वर क्लिक करा
 
 
आरोग्य अभियांत्रिकी देखभाल दुरुस्ती अंतर्गत काम करणारे सी. आर. टी. आस्थापनेवरील सी. आर. टी. वाहन चालकांची दिनांक ०१. ०१. २०२१ ची अंतिम सेवाजेष्ठता यादी.  
 
ई-निवीदा