नागपुर जिल्हा परिषद विषयी

NAGPURZP    24-Apr-2020
Total Views |

nagpur_1  H x W
  • आधुनिक भारताच्या निर्मितीमध्ये पंचायत राज हा एक अभिनव प्रयोग आहे.
  • बलवंतराय मेहता समितीने ग्रामिण विकासात ग्रामिण जनतेला सहभागी करून घेण्यासाठी त्रिस्तरिय पंचायत राज पद्धतीची शिफारस केली आहे.
  • त्याला अनुसरून महाराष्ट्र शासनाने 1 मे 1962 रोजी महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम 1961 चा कायदा सहमत केला व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद गट पातळीवर पंचायत समिती व गाव पातळीवर ग्राम पंचायत अशा रितीने त्रिस्तरिय पंचायत राज ची स्थापना केली
  • स्व. यंशवतरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मे 1962 मध्ये नागपूर जिल्हा परिषदेची स्थापना झाली. श्री छ्त्रपाल आनंदराव केदार यांना नागपूर जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष होण्याचा मान मिळाला. त्यानी दि. 12.08.1962 ते 11.08.1967 पर्यंत जिल्हा पारिषदेचे अध्यक्ष पद भुषविले. तेव्हापासुन आज अखेर जिल्हा परिषद नागपूर मध्ये 22 अध्यक्षांनी हे पद भुषविलेले आहे.
  • जिल्हा परिषद नागपूर मध्ये 13 पंचायत समित्या व 770 ग्राम पंचायती ग्रामिण विकासासाठी कार्यरत असुन त्यामधे 1872 गावे आहेत. शासनाच्या कोणत्याही योजना, अभियान, मोहिम, राबविण्यात जिल्हा परिषद नागपूर नेहमीच अग्रेसर राहलेली आहे.
  • जिल्हा परिषदेचा उद्देश केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांचे द्वारे ग्रामीण क्षेत्राचे विकासाकरिता येणा-या योजनांची अंमबजावणी करणे व त्या योजनांवर देखरेख ठेवणे. तसेच ग्रामस्थांपर्यंत या योजना पंचायत समिती व ग्रामपंचायत यांचे मार्फत पोहोचविणे व ग्रामीण क्षेत्रात विकासाचे उद्दिष्ठ गाठून ग्रामीण क्षेत्राच्या सर्वंकष विकास करणे
जिल्हा परिषद नागपुरचे सन्माननिय अध्यक्ष पद भुषविलेल्या पदाधिकारी याची यादी ख़ालील प्रमाणे.

अ.क्र.

मा. अध्यक्ष जिल्हा परिषद नागपूर यांचे नाव

कालावधी

पासुन

पर्यंत

01.

मा. श्री. छत्रपाल आनंदराव केदार

12.08.1962

11.08.1967

02.

मा. श्री. बळीराम दामुसाव दखने (प्र)

12.08.1967

27.03.1968

03.

मा. श्री. छत्रपाल आनंदराव केदार

28.03.1968

30.10.1975

04.

मा. श्री. प्रभाकर माधवराव किनखेडे

31.10.1975

05.03.1979

05.

मा. श्री. दे. ज. कुंभलकर (प्र.)

06.03.1979

19.06.1979

06.

मा. श्री. रणजीत अरविंद देशमुख

20.06.1979

24.06.1985

07.

मा. श्री. विठ्ठल अन्नाजी टालाटुले

25.06.1985

20.03.1992

08.

मा. श्री. पांडुरंग दौलत मते

21.03.1992

23.04.1992

09.

मा. श्री. सदानंद चंद्रभान निमकर (प्र.)

24.04.1992

06.07.1992

10.

मा. श्री. अनिल देशमुख

07.07.1992

14.03.1995

11.

मा. श्री. सदानंद चंद्रभान निमकर (प्र.)

15.03.1995

20.08.1995

12.

मा. श्री. अशोक पंजाबराव धोटे

21.08.1995

20.03.1997

13.

मा. श्रीमती रत्नमाला सुभाष पाटील

21.03.1997

08.12.1997

14.

मा. श्रीमती रत्नमाला सुभाष पाटील

05.03.1998

20.03.1998

15.

मा. श्री. बंडोपंत बापुराव उमरकर (प्र.)

09.12.1997

04.03.1998

16.

मा. श्री. पुरूषोत्तम मधुकर डाखोळे

21.03.1998

20.03.1999

17.

मा. श्रीमती सुमन दामोधर बावनकुळे

21.03.1999

20.03.2002

18.

मा. सौ. सुनिता रमेश गावंडे

21.03.2002

17.02.2005

19.

मा. श्री. श्यामदेव झिंगरूजी राऊत

18.02.2005

21.03.2007

20.

मा. श्री. रमेश नारायन मानकर

21.03.2007

01.12.2009

21.

मा. श्री. सुरेश यादवराव भोयर

02.12.2009

20.03.2012

22.

मा. सौ. संध्या अशोकराव गोतमारे

21.03.2012

20.09.2014

23.

मा. सौ. निशा टेकचंद सावरकर

21.09.2014

27.07.2019

24.

मा. सौ. रश्मी श्यामकुमार बर्वे

18.01.2020