अ) प्रसुतीपूर्व काळजी :-
• सर्व गरोदर स्त्रियांची नोंदणी (१२ आठवडयांचे आत)
• गरोदरपणात कमीत कमी पाच वेळा तपासणी :- पहिली तपासणी गरोदरपणाची शक्यता वाटल्याबरोबरच, दुसरी तपासणी (१२ आठवडेत) तिसरी तपासणी ४ ते ६ महिन्यांमध्ये (२६ आठवडे) चौथी तपासणी आठव्या महिन्यामध्ये (३२ आठवडे) तर पाचवी तपासणी ९ व्या महिन्यामध्ये (३६ आठवडे)
• संलग्र आवश्यक सेवा जसे सर्वसाधारण तपासणी, वजन, रक्तदाब, रक्तक्षयाकरिता तपासणी, पोटावरुन तपासणी, उंची, स्तनांची तपासणी, पहिल्या तिमाहीत फोलिक अॅसिडचे सेवन, १२ आठवडयानंतर लोह, फोलिक अॅसिड गोळयांचे सेवन, धर्नुवात प्रतिबंधक लसीची मात्रा, रक्तक्षयावरील उपचार इ. (आरोग्य सेविका, आरोग्य सहाय्यिका यांच्यासाठी मार्गदर्शक सूचनांनूसार)
• प्रयोगशाळेतील तपासण्या जसे हिमोग्लोबीन, लघवीतील प्रथिने व साखरेची तपासणी.
• जोखमीच्या गरोदर मातांचे निदान व योग्य ठिकाणी संदर्भसेवा.
ब) प्रसुतीदरम्यान सेवा :-
• आरोग्य संस्थेत प्रसुती करण्यावर भर देणे. (प्रवृत्त करणे)
• स्वच्छतेच्या ५ नियमांचे पालन करुन प्रशिक्षित व्यक्तीकडून बाळंतपण करणे.
• तत्पर व योग्यठिकाणी संदर्भसेवा देणे.
क) प्रसुतीपश्चात सेवा :-
• प्रसुतीपश्चात कमीत कमी २ वेळा गृहभेटी देणे. पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत तर दुसरी ७ ते १० दिवसांच्या दरम्यान गृहभेट देणे. मूल कमी वजनाचे असल्यास ४८ तासांच्या आत तसेच ७,१४,२१ व २८ दिवसात अशा पाच भेटी द्याव्यात.
• प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे.
• सल्ला व समुपदेशन :- आहार व विश्रांती, स्वच्छता, गर्भनिरोधन, नवजात बालकाची काळजी, अर्भक व मुलांचा आहार तसेच लैगिक आजार, ए.आय.व्ही.एड्स इ.बाबत.
क) प्रसुतीपश्चात काळजी :-
• उपकेंद्राच्या कर्मचार्यामार्फत कमीत कमी २ प्रसुतीपश्चात गृहभेटी :- पहिली प्रसुतीनंतर ४८ तासांच्या आत व दुसरी प्रसुतीनंतर ७ दिवसांच्या आत.
• प्रसुतीनंतर अर्ध्या तासाच्या आत स्तनपान सुरु करणे.
• आहार, स्वच्छता, कुटूंबनियोजना बाबत आरोग्य शिक्षण देणे.
ड) बालकाचे आरोग्य :-
• नवजात अर्भकाची काळजी
• ६ महिन्यांपर्यंत निव्वळ स्तनपान देणे.
• सर्व अर्भकांचे व मुलांचे लसीकरणाने टाळता येणार्या आजारांविरुध्द लसीकरण करणे.
• ५ वर्षापर्यंत सहा-सहा महिन्यांनी अ जिवनसत्वे ९ डोस देणे.
• बालकांमधील कुपोषण आणि आजारांचे प्रतिबंधन व उपचार करणे.