उद्देश – अनुसूचीत जमाती या संवर्गातील शेतकऱ्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणून त्यांची सामाजिक व आर्थिक उन्नती करणे.
योजनांचे क्षेत्र – आदिवासी उपयोजना ( क्षेत्राअंतर्गत ) ही केवळ रामटेक तालुकयातील काहीगावा-करीता असून, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना ही नागपूर जिल्हयाकरिता आहे. लाभार्थी निवडीचे निकष –
1) लाभार्थी अनु. जाती / जमाती संवर्गातील असावा. (प्राधिकृत अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र)
2) शेतकऱ्याचे नावावर जमिन असावी.( कमाल मर्यादा – 6 हेक्टर)
3) शेतकऱ्याचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न रु.25,000/- पेक्षा कमी असावे.
4) शेतकऱ्यास या योजनेचा लाभ यापूर्वी मिळालेला नसावा.
5) लाभार्थी स्वेच्छेने शेतीची कामे करण्यास व योजनेत सहभागी होणेस उत्सुक असावा.
लाभार्थी निवडीचे अधिकार– अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय निवड समितीकडे लाभार्थी निवडीचे पुर्ण अधिकार आहेत. पंचायत समीती कडून प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांस लाभार्थी निवड समिती मान्यता देते.
निधीची उपलब्धता –
या योजना राज्य पुरस्कत असून संपुर्ण निधी राज्य शासनाकडून प्राप्त होतो. आवश्यक कागदपत्रे –
1) गट विकास अधिकारी यांचे नावे अर्ज.
2) 7/12 व 8/अ चा तलाठयाकडील उतारा
3) प्राधिकृत अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र.
4) प्राधिकृत अधिकाऱ्याचे उत्पन्नाचा दाखला किंवा बीपीएल लाभार्थी असलेबाबत प्रमाणपत्र.
अनुदान – योजनेमध्ये निवड झालेनंतर लाभार्थ्यास दोन वर्षात जास्तीत जास्त रु. 1,00,000/-(नविन विहिर करणाऱ्यास) किंवा रु. 50,000/- इतर बाबींसाठी लाभ देता येतो.
लाभार्थीना द्यावयाच्या बाबी –
अ. क्र. बाब अनुदानाची मर्यादा रु.
1 निविष्ठा वाटप (1 हेक्टर मर्यादेत)रु.5,000/- च्या मर्यादेत
2 पिक संरक्षण / शेतीची सुधारीत औजारे रु.10,000/- च्या मर्यादेत
3 जमिन सुधारणा ( 1 हेक्टर मर्यादेत) मृद संधारण निकषानुसार रु.40,000/- च्या मर्यादेत
4 बैलजोडी / रेडेजोडी (स्थानिक बाजार भावानुसार) रु.30,000/- च्या मर्यादेत
5 बैलगाडी रु.15,000/- च्या मर्यादेत
6 जुनी विहिर दुरस्ती रु.30,000/- च्या मर्यादेत
7 इनवेल बोअरींग (नाबार्डच्या निकषानुसार) रु.20,000/- च्या मर्यादेत
8 पाईप लाईन (300 मीटर पर्यंत व (नाबार्डच्या निकषानुसार) रु.20,000/- च्या मर्यादेत
9 पंपसंच रु.20,000/- च्या मर्यादेत
10 नविन विहिर (रोहयो अंतर्गत जवाहर विहीर योजनेनुसार) रु.70,000/- ते रु.1,00,000/- च्या मर्यादेत
11 शेततळे (मृद संधारण निकषानुसार) रु.35,000/- च्या मर्यादेत
12 परसबाग कार्यक्रम (फलोत्पादन विभागच्या निकषानुसार) रु.200/- प्रती लाभार्थी
13 तुषार /ठिबक सिंचन संच पुरवठा रु.25,000/- च्या मर्यादेत
5) राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रम
राष्ट्रीय बायोगॅस योजनेची सुरुवात देशामध्ये सन 1982-83 पासून झालेली असून ही योजना केंद्र शासनाच्या वीस कलमी कार्यक्रमामध्ये समाविष्ठ आहे.
• योजनेची उद्दिष्टे :-
1.स्वयंपाकासाठी व इतर घरगुती उपयोगासाठी बायोगॅस चा वापर करणे.
2.एल.पी.जी व इतर पारंपारीक ऊर्जा साधनांचा वापर कमी करणे
3. ग्रामिण भागातील स्त्रीयांचे धुरापासून संरक्षण करणे व सरपणासाठी पडणाऱ्या कष्टापासून सुटका करणे.
4. सरपणासाठी आवश्यक असलेली लाकुडतोड थांबवुन वनांचे संरक्षण करणे.
5. बायोगॅस प्रकल्पा पासुन निर्माण होणाऱ्या शेणखतांचा वापर शेतीसाठी करुन रासायनिक खतांचा वापर कमी करणे
6. शौचालयाची जोडणी बायोगॅस सयंत्रास करून गाव व परिसर स्वच्छ करणे.
7. बायोगॅस चा वापर गॅस चलित इंजिन व रेफ्रिजरेटर मध्ये करून डिझेल व पेट्रोलचा वापर कमी करणे
8. रासायनीक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर करण्यास लाभर्थ्यांना प्रवृत्त करणे
• योजने अतर्गत लाभार्थीस मिळणारे अनुदान
1) 1 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- अ.जा. / अ.ज. प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. ७०००/-
2) 1 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- इतर प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 5500/-
3) 2 ते 6 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- अ.जा. / अ.ज. प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 11000/-
4) 2 ते 6 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्रकल्प :- इतर प्रवर्गातील लाभार्थी देय अनुदान रु. 9000/-
5) बायोगॅस संयंत्रास शौचालय जोडणी केल्यास जादाचे अनुदान :- रु.1200/-
6) टर्न कि फी रक्कम प्रति सयंत्र रु. 1500/-
अनुदान मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे:-
1) गट विकास अधिकारी यांचे नावे विहीत नमुन्यात अर्ज.
2) लाभार्थींच्या नावे शेतीचा 7/12 व 8 अ चा उतारा.
3) लाभार्थी भूमिहीन शेतमजुर असल्यास तलाठ्यांचा दाखला
4) लाभार्थ्याचा पुर्ण केलेल्या सयंत्रासह फोटो
5) ग्रामसेवकांचा 5 ते 6 जनावरे असल्याचा दाखला
लाभार्थीने संयंत्र स्वखर्चाने बांधुन पंचायत समितीमध्ये अर्ज दाखल करावा
• बायोगॅस संबंधी सर्व साधारण संकीर्ण माहिती:-
1) गोठयामध्ये बांधुन असणाऱ्या एका दुभत्या जनावरापासून 24 तासात सरासरी 10 ते 15 किलो शेण मिळु शकते व बाहेरुन चरुन येणाऱ्या जनावरापासून सरासरी 7 ते 10 किलेा शेण मिळू शकते तसेच लहान वासरापासून दिवसाला 2 ते 3 किलो शेण मिळू शकते .
2) एक किलो शेणापासून सुमारे 40 लि. बायोगॅस निर्माण होतो तसेच 1 किलो खरकटे पासुन सुमारे 80 लि. गॅसची निर्मिती होते.
3) एका व्यक्तीच्या दैनंदिन गरजेसाठी सुमारे 250 लि. बायोगॅसची आवश्यकता असते.
4) एक घनमिटर बायोगॅस म्हणजे 1000 लि. गॅस
5) पाच लिटरच्या डब्यामध्ये सर्वसाधारणपणे 18 ते 20 किलो शेण बसते.
बायोगॅस सयंत्राचे प्रकार व मॉडेल
बायोगॅस सयंत्राचे मुख्यत: दोन प्रकार आहेत.
या प्रकारामध्ये लोखंडी टाकीचावापर करण्यात येतो. यातील काही मॉडेल खालील प्रमाणे आहेत.
1) गोबर/ के.व्ही.आय.सी. गॅस संयंत्र :- या प्लँन्टची बांधणी विहिरी प्रमाणे असते या प्रकारात लोखंडी टाकीचा वापर केला जातो मात्र लोखंडी टाकी 5 ते 10 वर्षात गंजून निकामी होत असल्याने सध्याच्या काळात या प्रकारचा गॅस प्लँन्टचा वापर कमी झाल्याचे दिसुन येते.
2) वॉटर जॅकेट ( पाणकडयाचा ) गॅस प्लँन्ट :- या प्रकारच्या प्लँन्ट मध्ये लोखंडी टाकीच्या कडेने बांधकाम करुन जॅकेट तयार करुन त्यामध्ये पाणी भरलेले असते यामुळे या प्लँन्ट मध्ये गॅस गळती होत नाही. या प्लँन्ट मध्ये शेण अगर मैला पूर्णपणे टाकीच्या आतच राहतो त्यामुळे प्लँन्ट मधुन जास्तीत जास्त गॅस मिळतो. हा प्लँन्ट फक्त मैल्यावर चालवला तरी थोडी सुद्धा गहाण येत नाही . वॉटर जॅकेट मध्ये पाण्यात मधून मधून जळके तेल (वेस्ट ऑईल) टाकल्यास तेल लेाखंडी टाकीला लागुन टाकी गंजत नाही.
3) गणेश गॅस प्लँन्ट :- या प्रकारात लोखंडी टाकीचा वापर करण्यात येत असुन पाचक यंत्र व गॅस टाकी तयार मिळते. पाचक यंत्र लोखंडी पट्टया व बांबुच्या कामटयाचे बनवतात. लोखंडी पट्टया गंजून या प्रकारच्या प्लँन्टचे आयुष्य कमी होण्याचा संभव आहे.
घुमट आकाराचा (फिक्स डोम ) बायोगॅस प्लॅन्ट
या प्रकारच्या प्लँन्ट मध्ये लोखंडी टाकीचा वापर करण्यात येत नाही. या प्रकारच्या प्लँन्टची मॉडेल खालील प्रमाणे आहेत.1) दिनबंधु गॅस संयंत्र – या प्रकारचे सयंत्र घुमटा आकार असून संपूर्ण सयंत्र जमीनी खाली असते. या संयंत्राचे बांधकाम विटा पासून किंवा आर.सी.सी. पद्धतीने करता येते. या प्रकारचे मॉडेल पूर्णपणे जमीनी खाली असल्याने अंगणात ही करता येते. या प्रकारच्या संयंत्रात इन लेट व आउट लेट मोठ्या आकाराचे असल्याने शेणा शिवाय इतर सडणारे व कुजणाऱ्या पदार्थाचा तसेच लहान मृत जनावरे (कुत्रे, मांजर, उंदीर,कोंबडी) या वापर करुन गॅस व खत मिळवता येते. प्लँन्टची खोली कमी व घुमटावर मातीचा भराव असल्यामुळे उबदारपण राहतो व गॅस निर्मिती जास्त होते. सध्याच्या काळात या प्लॅन्ट चा वापर जास्त होताना दिसुन येत आहे. 3 घ. मि. गॅस प्लॅन्ट बांधण्यासाठी आवश्यक मटेरिअल – खोदकाम मोजमापा प्रमाणे, सिमेंट 16 पोती, खडी (1/2” ¾”) 30 घ. फु. , विटा लहान साईज 1600 नग, वाळु 1.25 ब्रास व इतर आवश्यक मटेरिअल
2) जनता गॅस प्लॅन्ट :- लोखंडा शिवाय हा प्लँन्ट बनत असल्याने दिर्घायुषी आहे. इनलेट व आउट लेट मोठया आकाराचे असल्याने शेणाशिवाय इतरही सडणारे व कुजणारे पदार्थ प्लँन्ट मध्ये टाकुन गॅस व खत निर्मिती करता येते.
3) मलप्रभ्रा गॅस प्लॅन्ट :- मानवी मलाचा उपयोग करून गॅस निर्मिती या प्लॅन्ट द्वारे करण्यात येते. सार्वजनिक संडास, मोठया सोसायट्यांमधील सेफ्टीक टँक ऐवजी या प्रकारचा गॅस प्लॅन्ट बांधल्यास सार्वजनिक ठिकाणी गॅस निर्मिती करुन तिचा वापर विज निर्मिती साठी करण्यात येवू शकतो. 1 घ. मि. गॅस प्लॅन्ट बांधण्यासाठी आवश्यक मटेरिअल – खोदकाम- 8’x 6’ 5’ सिमेंट 15 पोती, खडी (1/2″ 3/4″) 50 घ. फु. , विटा लहान साईज 2000 नग, दगड (8″ 10″) 1/2 ब्रास, रेती 1.5 ब्रास व इतर आवश्यक मटेरिअल