गट साधन केंद्र(BRC):- तालुक्यातील सर्व शाळांमध्ये विविध अनुदानाचे वितरण करणे, उपक्रमाचे अंमलबजावणी शाळास्तरावर करवून घेणे. या स्तरावर गटशिक्षणाधिकारी यांचे नेतृत्वात कनिष्ठ अभियंता, रोखपाल, साधन व्यक्ती, एमआईएस को ऑर्डीनेटर , डेटा एन्ट्री ऑपरेटर उपक्रम अंमलबजावणीचे कार्य सांभाळतात.
समूह साधन केंद्र(CRC):– केंद्रस्तरावरील सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानाचे संपूर्ण उपक्रम राबविण्याचे कार्य पार पाडतात.
संकल्पना :-
भारतीय राज्यघटनेच्या 45 व्या कलमानुसार 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलामुलींना प्राथमिक शिक्षण मोफत वा सक्तीचे करण्यात आले आहे. त्यानुसार सन 2002 साली घटनेत दुरुस्ती करुन शिक्षणाचा हक्क मुलभूत हक्क म्हणुन प्राथमिक शिक्षणाच्या घटनेच्या 21 (अ ) कलमात अंतर्भाव करण्यात आलेला आहे. अनेक वर्षापासून जोपासलेले प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचे उददीष्टे पुर्ण करण्यासाठी सर्व शिक्षा अभियान हा उपक्रम सुरु करण्यात आलेला आहे. विशिष्ट कालावधीत एकात्मक पध्दतीने राज्याच्या भागेदारीने हा कार्यक्रम अंमलात येत आहे.
सर्व शिक्षा अभियान म्हणजे वाडी, वस्ती मध्ये असणा-या समाजाच्या मदतीने वयोगट 6 ते 14 सर्व मुलामुलींना दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देऊन त्यांच्यामधील मधिल मानवी क्षमतांचा विकास साधणारा नियोजन बध्द कार्यक्रम आहे. ही केंद्र पुरस्कृत योजना असुन शालेय व्यवस्थापनामध्ये समाजाच्या सक्रिय सहभागादंवारे प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकिकरण करण्यासाठी कलेला एक वैशिष्टपुर्ण उपक्रम आहे.
अभियानाची वैशिष्टे :-
सर्व शिक्षा अभियान हा प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकिकरणाचा कालबदध कार्यक्रम होय
सर्व शिक्षा अभियानातुन प्राथमिक शिक्षणादंवारे सामाजिक न्याय वृध्दीगत करण्याची संधी प्राप्त झाली आहे.
सर्व शिक्षा अभियानादंवारे पंचायत राज संस्था, ग्रामशिक्षण समिती, ग्रमिण व शहरी भागातील झोपडपटटी पातळीवरिल शिक्षण समिती, पालक शिक्षक संघ, माता पालक संघ, आदिवासी स्वायत्त संस्था आणि वस्ती पातळी वरिल संस्थांना प्राथमिक शाळेच्या व्यवस्थापनात सहभागी करुन घेण्याचा प्रयत्न करणे.
सर्व शिक्षा अभियानाच्या कार्यवाहीत स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य व केंद्र सरकार यांची भागीदारी आहे.
सर्व शिक्षा अभियानामध्ये वाडया, वस्त्या व स्थानिक पातळीवरिल गरजेनुसार पर्यायाने तालुक्याच्या जिल्हाच्या व राज्याच्या विकास साधण्याकरीता एक महत्वपुर्ण संधी प्राप्त झाली आहे.
ध्येय : –
1) सन 2010 पर्यत 6 ते 14 वयेगटातील सर्व मुला मुलीना उपयुक्त दर्जेदार प्राथमिक शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करुन देणे.
2) समाजाच्या / वस्तीच्या किंवा स्थानिक लोकांच्या शालेय वातावरणातील सक्रिय सहभागादंवारे सामाजीक, प्रादेशीक आणि लिंग विषयक भेदभाव कमी करणे.
3) शाळा व समाज एकत्र आणून विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न करणे
उद्दीष्टे :-
1) इ.स.2003 पुवी सर्व मुले शाळेत, शिक्षण हमी केंद्रात, पर्यायी शाळेत परत आणण-या व्यवस्थेत दाखल करणे.
2) इ.स.2007 पुर्वी सर्व मुलांना 5 वी पर्यतचे व इ.स.2010 पुर्वी सर्व मुलांना 8 वी पर्यतचे प्राथमिक शालेय शिक्षण देणे.
3) दर्जेदार प्राथमिक शिक्षणावर तसेच जीवनासाठी शिक्षणावर भर देणे
4) इ.स.2007 पुर्वी प्राथमिक शिक्षणातील सर्व स्तरावरील उणिवा दुर करुन सामाजीक तसेच लिंग भेद व समाजाच्या विविध घटकांतील दरी इ.स.2007 पर्यंत भरुन काढणे.
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत उपक्रम:-
1) गटसाधन केंद्र
2) समुह साधन केंद्र
3) शाळा बांधकाम व गरजेनुसार शाळागृहाचे बांधकाम शाळा व्यवस्थापन समिती मार्फत पुर्ण करण्यात येते.
4) पर्यायी शिक्षण व शिक्षण हमी योजना. वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमीयोजना, राजीव गा्धी संधीशाळा,सेतु शाळा,
हंगामी महात्मा फुले शिक्षण हमी योजना, उपचारात्मकअभ्यासक्रम.
5) नाविण्यपुर्ण उपक्रम
अ ) संगणक शिक्षण
ब ) बालशिक्षण व संगोपण
क) मुलीचे शिक्षण
ड) अनुसुचीत जाती – जमातीच्या मुलांचे शिक्षण
इ) अल्पसंख्यांक शिक्षण
6) अपंग समावेशित शिक्षण- साहित्य साधनांचा पुरवठा, अडथळा विरहीत वातावरण, शिक्षण व्यवस्था, गृहमार्गदर्शन, वैयक्तिक शैक्षणिक आराखडा, शाळेत ने आण करण्यासाठी मदतनिस भत्त्ता,लेखनीक_वाचनिक भत्त्ता, प्रवास भत्त्ता, गरजेनुसार शस्त्रक्रिया.
7) संशोधन, मुल्यमापन, पर्यवेक्षण व संनियंत्रण
8) अनुदान – शाळा, शिक्षक_देखभाल दुरुस्ती, अध्ययन-अध्यापन साहित्य अनुदान.
9) शिक्षक प्रशिक्षण
10) लोकप्रतिनिधी प्रशिक्षण
11) मोफत पाठयपुस्तके इयत्ता 1 ली ते 8 वी तील सर्व मुला-मुलींना
12) अध्ययन समृध्दी कार्यक्रम (LEP)
13) सर्वांगिण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यकम
14) निकष पुर्ण करीत असलेल्या वाडया-वस्तीवर नविन शाळा उघडणे.
15) तीन किलोमीटर परिसरात उच्च प्राथामिक शाळा असल्यास अस्तीवात असलेल्या प्राथमिक शाळेचे उच्च प्राथामिक शाळेत
रुपांतर करणे.
16) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत शिक्षक समुघ्दीकरण, डिजिटल शाळा, पायाभुत चाचणी, संकलित मुल्यमापन