१ ) शालान्तपूर्व शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती :-
उद्दिष्ट:
अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
निकष :
१. इयत्ता १० वी पर्यंतचे शिक्षण घेणारे अंध, कर्णबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी तसेच विशेष शाळेतील मतिमंद विद्यार्थी.
२. विद्यार्थाकडे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे अपंगत्व प्रमाणपत्र असावे.
३. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा झालेला नसावा.
लाभाचे स्वरूप :
अ. क्र. |
इयत्ता |
शिष्यवृत्ती दर रुपये दरमहा |
१ |
इयत्ता १ ली ते ४ थी(कर्ण बधिर पायरीवर्गापासून) |
रुपये १०० /- |
२ |
इयत्ता ५ वी ते ७ वी |
रुपये १५० /- |
३ |
इयत्ता ८ वी ते १० वी. |
रुपये २०० /- |
४ |
मतिमंद मानसिक विकलांग (नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त विशेष शाळेतील) |
रुपये १५० /- |
५ |
अपंग कार्यशाळेतील प्रशिक्षणार्थी |
रुपये ३०० /-
|
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज गायलं अधिकारी
२. सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
२) शालांत परिक्षेत्तर शिक्षण घेणाऱ्या अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती :-
उद्दिष्ट:
अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
अटी व शर्ती :
१. इयत्ता १० वी पुढील शिक्षण घेणार अंध , कर्णबधिर व अस्थिव्यंग प्रवर्गातील विद्यार्थी विद्यार्थ्यांकडे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
२. विद्यार्थी एकाच इयत्तेत दोन वेळा नापास झालेला नसावा.
लाभाचे स्वरूप :
अ. क्र. |
अभ्यासक्रमाचा गट |
वसतिगृहात राहणारे
दरमहा |
वसतिगृहात न राहणारे
दरमहा |
१. |
गट अ(वैद्यकीय व अभियांत्रिकी पदवी शिक्षण, अग्रीकलचर, व्हेटरनरी मधील पदवी व पदव्युत्तर शिक्षण) |
१२००/- |
५५०/- |
२. |
गट ब (अभियांत्रिकी तांत्रिक, स्थापत्य, वैद्यकशास्त्र, पदविका अभ्यासक्रम) |
८२०/- |
५३०/- |
३. |
गट क(कला, विज्ञान, वाणिज्य, मधील पदव्युत्तर) अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक पदविका अभ्यासक्रम). |
५३० |
८२० |
४. |
गट ड (द्वितीय वर्ष व त्यानंतर पदवीपर्यंत चा अभ्यासक्रम) |
५७० |
३०० |
५. |
गट इ (११ वी, १२ वी व पदवी प्रथम वर्षाचा अब्भ्यासक्रम |
३८० |
२३० |
|
शिष्यवृत्तीचा रक्कमेबरोबर विद्यापीठांना / शिक्षण शुल्क समितीने मान्य केलेले शिक्षण शुल्क , अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता प्रकल्प टंकलेखन खर्च अभ्यासदौरा खर्च देण्यात येते. |
संपर्क:–
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी
२. सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/ उपनगर.
३) शारीरिकदृष्ट्या अपंग व्यक्तींना लघु-उद्योगांसाठी वित्तीय सहा :-
उद्दिष्ट : अपंग व्यक्तींना लघु-उद्योगांसाठी वित्तीय साहाय्य उपलब्ध करून देणे.
अटी व शर्ती.
१. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
२. वयोमर्यादा १८ ते ५० वर्षे.
३. अपंग व्यक्तीचे किमान ४० वा त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
४. वार्षिक उत्पन्न रु. १.०० लाखापेक्षा कमी असावे.
लाभाचे स्वरूप :
१. रुपये १.५० लाखांपर्यंतच्या व्यावसायिक ८०% बँक मार्फत कर्ज व २० % अथवा कमाल रुपये ३०,०००/- सबसिडी स्वरूपात अर्थसहाय .
संपर्क:
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी.
२. सहायक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर / उपनगर.
४) शारीरिकदृष्ट्या अपंगांना त्याचे अपंगत्वानुसार कृत्रिम अवयव पुरविणे :-
उद्दिष्ट: अपंगाचे शारीरिक पुनर्वसन करणे.
निकष :
१. अपंग व्यक्तीचे किमान ४० व त्यापेक्षा जास्त टक्क्यांचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र असावे.
२. अपंग व्यक्तीचे दरमहा दरमहा उत्पन्न रुपये २०००/- पेक्षा कमी असावे.
३. महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
४. उपकरणाची / साधनांची आवश्यकता असल्याचे तज्ञांचे शिफारीसपात्र असावे.
लाभाचे स्वरूप :
१. अस्थिव्यंग अपंग व्यक्तींना तीन चाकी सायकल, कृत्रिम अवयव, कुबड्या, कॅलिपर्स इत्यादी साधने तसेच अंध व्यक्तींना चष्मे, काठ्या,इयत्ता १० वी पुढील अंध व्यक्तींना शिक्षणासाठी टेप रेकॉर्डर, कर्णबधिरांसाठी वैयक्तिक श्रवणयंत्र इत्यादी साधनांसाठी रुपये ३००० रु- पर्यंतचे अर्थसहायय उपलब्ध करून देणे.
संपर्क:
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी
२. साहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
५) अपंग अव्यंग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान देणे :-
उदिद्ष्टे :
१. अपंग व अपंगत्व असलेल्या व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहनपर अनुदान देणे
२. विवाहासाठी आर्थिक सहाय्या करणे
अति व शर्ती :
१. अर्जदाराचे अपंगत्व किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त असावे.
२.अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
लाभाचे स्वरूप :
किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या अपंग वधु किंवा वराने अपंगत्व नसलेल्या वधु किंवा वाराशी विवाह केल्यास अथवा अपंगत्व नसलेल्या वधु किंवा वराने अपंगत्व असलेल्या वधु इन्वा वाराशी विवाह केलेल्या या योजनेतून खालीलप्रमाणे अर्थसाहाय्य देण्यात येईल.
अ) रुपये २५०००/- चे बचत प्रमाणपत्र
ब) रुपये २००००/- रोख स्वरूपात
क) रुपये ४५००/- संसार उपयोगी साहित्य / वस्तू खरीदीसाठी देण्यात येईल
ड) रुपये ५००/- स्वागत समारंभात कार्यक्रमाचा खर्च करण्यासाठी देण्यात येईल.
संपर्क :
१. संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी
२. साहाय्यक आयुक्त , समाज कल्याण , मुंबई शहर /उपनगर
वृद्ध कलावंत मानधन योजना
उदिद्ष्टे :
१. साहित्य व कला क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या पात्र वृद्ध कलावंतांच्या उदरनिर्वाहासाठी शासनातर्फे दरमहा अनुदान देण्याची योजना राबविलेली आहे. त्यासाठी कलावंताचे वय ५० वर्ष, उत्पन्नाचं दाखला व राज्यस्तरीय कार्यक्रम सादर करल्याबाबतचे ठोस पुरावे सादर करणे आवश्यक आहे. दरवर्षी ६० कलावंताची अनुदानासाठी शिफारस करण्यात येते.
अ.क्र. |
श्रेणी |
श्रेणी नुसार मानधन रक्कम |
१ |
अ श्रेणी |
दरमहा २१००/- रुपये मानधन |
२ |
ब श्रेणी |
दरमहा १८०० /- रुपये मानधन |
३ |
क श्रेणी |
दरमहा १५०० /- रुपये मानधन |
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी ,जिल्हा परिषद.
जिल्हा परिषद २० टक्के सेस फंड (वैयक्तीक लाभाची योजना )
उदिद्ष्टे :
जिल्हा परिषदेच्या ऊतपन्नातून सदर योजना राबविल्या जाते. समाज कल्याण समितीच्या शिफारसीनुसार मागासवर्गीय विध्यार्थी व शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी व बेरोजगारांसाठी वैयक्तिक योजने अंतर्गत १०० टक्के अनुदानावर लाभाथरना साहित्य वाटप केले जाते.
लाभाचे स्वरूप :
१. शालेय शिक्षण घेणाऱ्या मागासवर्गीय विध्यार्थी विद्यार्थिनींना लेडीज सायकल पुरविणे .
(टीप:- शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेपासून अंतर किमान २ कि मी असणे आवश्यक )
२. मागासवर्गीय महिलांना शिलाई मशीन पुरविणे
( अनु. जाती / वि.जा./भ./ज/वि. मा .प्र)
(टीप:- शिवणकला प्रमाणपत्र व जातीचे प्रमाणपत्र आवश्यक )
३. मागासवर्गीय शेतकऱ्यांना ताडपत्री पुरवणे.
४. मागासवर्गीय शेतकऱ्यांना मोटर पंप पुरवणे.
५. मागासवर्गीय शेतकऱ्यांना एच.डी.ई.पी पाईप पुरवणे.
६. मागासवर्गीय शेतकऱ्यांना ऑईल इंजिन पुरवणे.
( टीप:- मागासवर्गीय शेतकऱ्यांना वरील लाभासाठी अर्जासोबत शेतीचा ७/१२,८(अ) व नकाशा तसेच जातीचे प्रमाणपत्र आवश्यक)
७.मागासवर्गीय बेरोजगारांना बिछायत केंद्र लाऊडस्पिकर मंडप डेकोरेशन देणे.
(टीप:- ग्रामसेवक याचे अर्जदार बेरोजगार असल्याचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, जागा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक)
८.मागासवर्गीय वस्तीची सुधारणा
९. मागासवर्गीय बेरोजगारांना शेवई मशीन पुरविणे .
१०.मागासवर्गीय बेरोजगारांना एअर कॉम्प्रेसर पुरवणे.
११.ग्रामीण भागातील मागासवर्गीय सोलर कंदील पुरविणे.
( टीप:- वरील सर्व योजनांचे प्रस्ताव पंच्यात समित्या मार्फत स्वीकारले जाते)
अनु-जाती व नवबोध्द्द घटकाच्या वस्तीचे विकास करणे योजना.
उदिद्ष्टे :
अनुसेचित जाती व नवबोध्द्द घटकाच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी प्रत्येक दलित वस्त्यांमध्ये नळ पाणी पुरवठा, गटारे, स्वच्छता विषयक सोयी. जोड रस्ते, अंतर्गत रस्ते, समाज मंदिर, इत्यादी पायाभूत व्यवस्था करून त्याचा सर्वागीण विकास कारण्यासठी हि योजना आहे.
लाभाचे स्वरूप :
शासन निर्णय दिनांक ०५ डिसेम्बर २०११ अन्वाये लोकसंख्येच्या निकषानुसार प्रत्येक अनुसूचित जाती व नवबोध्द्द घटकांच्या वस्तीला लोकसंख्येच्या प्रेमात खालील प्रमाणे अनुदान देण्यात येते.
अ.क्र. |
लोकसंख्या |
अनुदान रुपये |
१ |
१० ते २५ |
२ लक्ष |
२ |
२६ ते ५० |
५ लक्ष |
३ |
५१ ते १०० |
८ लक्ष |
४ |
१०१ ते १५० |
१२ लक्ष |
५ |
१५१ ते ३०० |
१५ लक्ष |
६ |
३०१ च्या पुढे |
२० लक्ष |
१ या योजने अंतर्गत घ्यावयाच्या कामाचा सन २०१३ पासून पुढील पाच वर्षात बृहत आराखडा तयार करण्यात आलेला आहे. तो संबंधित जिल्हयात संकेत स्थळावर उपलब्ध आहे .
२. बृहत आराखड्यमध्ये नमूद असलेल्या कामाचा प्रस्ताव योग्य त्या कागदपत्रासह गरपंचायतीने तयार करून गट विकास अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाकडे सादर करणे अपेक्षित आहे.
संपर्क :
१. संबंधित जिल्ह्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
आंतर जातीय विवाहित जोडप्यांना प्रोत्साहनपर अनुदान
उदिद्ष्टे : राज्यातील जातीयता भेदाभेद कमी करण्यासाठी जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी आंतरजातीय विवाहित जोडप्याना अर्थसहया देणे हि योजना सुरु करण्यात आलेली आहे.
लाभाचे स्वरूप :
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग यापैकी एक व्यक्ती आणि सवर्ण हिंदू , जैन , लिंगायत , बौद्ध , शीख या पैकी दुसरी अशनी विवाह केल्यास तसेच मागासवर्गातील अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती , विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्गतील विवाहित जोडप्याना या योजने अंतरर्गात फेब्रुवारी २०१० नंतर आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना रुपये ५००००/- अर्थसहाया देण्यात येते. सदर धनाकर्ष पती पत्नीच्या संयुक्त नावाने प्रदान करण्यात येतो.
संपर्क :
१. संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी , जिल्हा परिषद / समाज कल्याण अधिकारी वर्ग -२, बृहमुंबई .(मुंबई क्षेत्रासाठी )
अनुदानित वृद्धाश्रमे व व्यसनमुक्ती
उदिद्ष्टे :
१. वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे व सुखसमाधानासाठी घालावीता यावी या करीत योजना सुरु करण्यात आली.
२. व्यसनाधीन लोकांना व्यसनमुक्ती करणे.
लाभाचे स्वरूप :
१ . शासन मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थामार्फत अनुदान तत्वावर वृद्धाश्रम चालविण्यात योजना सन १९६३ पासून कार्यानेवित आहे.
२. संस्था हि संस्थ नोंदणी अधिनियम १९६० व सार्वजनिक विशवस्त अधिनियम १८५० अंतर्गत नोंदणीकृत असावी.
३. सदर वृद्धाश्रम अन्न,वस्त्र ,निवारा, औषधोपचार ,करमणूक, मनोरंजनाची सोया मार्फत करण्यात येते.
४.वृद्धाश्रमात निराधार व निराश्रित ६० व निराश्रित ६० वर्ष वरील पुरुष व ५५ वर्ष वरील स्त्रियांना प्रवेश देण्यात येतो.
५.प्रत्येक वुद्धामागे परिपोषण अनुदान १ जानेवारी २०१२पासून प्रतिमाह रुपये ६३०/- ऐवजी रुपये ९००/-या प्रमाणे
देण्यात येते.
६.वुद्धीश्रामाची प्रवेश संख्या कमीत कमी २५ आहे तसेच प्रत्येक वुद्धीमागे इमारत बांधकाम अनुदान रुपये ७५०/- एकदाच दिले जाते.
७.मान्यता प्राप्त व्यसनमुक्ती केंद्रास केंद्र शासनाकडून अनुदान देण्यात येते.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण
२.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
दिव्यांगांसाठी शासकीय संस्था
१. शासकीय अपंगांची कर्मशाळा:
या संस्थेमध्ये १८ ते ४५ वर्ष वयोगटातील अस्तिव्यंग व मूकबधिर लाभार्थ्यांना संगणक प्रशिक्षण,सुतारकाम,आर्मचर वाईडींग व शिवणकला या अभ्यासक्रमास प्रवेश देण्यात येते.
२.शासकीय वहु अपंग मुलाचे समीश्र केंद्र:
या संस्थेमध्ये ६ ते १६ वर्ष वयोगटातील अस्तिव्यंग व मूकबधिर मुलांना शिक्षणाकरिता प्रवेश देण्यात येते.
३.शासकीय अपंग बाल विकास गृह:
या संस्थेमध्ये ६ ते १६ वर्ष वयोगटातील अस्तिव्यंग विद्यार्थ्यांना शिक्षण व पुर्नसनासाठीप्रवेशदेण्यात येते.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
स्वयंसेवी संस्थामार्फत दिव्यांगांसाठी विशेष शिक्षण देणा-या अनुदानित विशेष शाळा/कर्मशाळा
उदिद्ष्ट:
१.विशेष शाळा ६ ते १८ वयोगटातील अपंग विदयार्थ्यांना मोफत विशेष शिक्षण
२. विशेष कर्मशाळा १८ ते ४५वयोगटातील अपंग किंवा प्रौढ़ व्यक्तींना मोफत विशेष प्रशिक्षण
लाभाचे स्वरूप:
१.विशेष शाळा- अंध,मूकबधिर,मतिमंद, अस्थिव्यगं विदयार्थ्यांना विशेष शिक्षण पद्धतीने व विशेष शैक्षणिक साहित्याचा वापर करून मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे ,यासह निवास व भोजनजी व्यवस्था करणे.
२.विशेष कार्यशाळा- अंध,मूकबधिर,मतिमंद, अस्थिव्यगं प्रौढ़ व्यक्तींना विशेष प्रशिक्षणाद्वारे अपंगत्वानुसार विविध व्यवसायाचे विशेष प्रशिक्षण देणे.यासह मोफत निवास व भोजनाची व्यवस्था करणे.
स्वयंसेवी संस्थाना अर्थसहा:
वेतन – कर्मचारी आकृतिबंधाप्रमाणे मान्य कर्मचाऱ्यांची १०० टक्के वेतन खर्च.
वेतनेत्तर – वेतन खर्चाच्या ८ टक्के मयादित.
इमारत – सार्वजनिक बांधकाम व अस्थिव्यगं प्रवगातील प्रति विद्याथीं दरमहा ९००/- व मतिमंद प्रवगातील प्रति विद्याथीं रुपये९९०/-प्रमाणे १० महिन्यांकरिता.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
२.सहाय्य्यक आयुक्त,समाज कल्याण, मुंबई शहर/उपनगर
स्वयंसेवी संस्थामार्फत चालवण्यासाठी येणा-या अनुदानित वसतिगृहांनाअनुदान योजना
उदिद्ष्ट:
अनु.जाती,अनु जमाती,विजाभज,विमाप्र,इमाव,अनाथ व निराश्रीत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येत असून त्यांना निवास,भोजन,अंथरून-पांघरून इ.सोई सुविधा मोफत देण्यात येतात.जिल्ह्यात १०० वसतीगृह असून
वर्ग ५ ते १२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाते.
संपर्क:
१.संबंधित जिल्हयाचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
राखीव ३ टक्के जिल्हा निधी मधुन अपंगासाठी राबविण्यात येणा-या योजना
उदिद्ष्ट:
१.जिल्हा निधी अंतर्गत अपंग- अपंग व्यक्ती विवाहित जोडप्यांना अर्थसहाय्य देणे.(रु.२५,०००/-)
२.अपंगांना संगणक प्रशिक्षण/ व्यवसाय प्रशिक्षण मोफत देणे.
३.अपंग पुनर्वसन केंद्र थेरपी सेंटर सुरु करणे.
४.बेरोजगार अपंगांना व्यवसायासाठी झेरॉक्स मशीन पुरविणे.
५.अपंगांना तीनचाकी सायकल/ट्रायसिकल पुरविणे (४०% अपंगत्त्व असणे आवश्यक)
६.मतिमंद व्यक्ती करिता निरामय योजनेचे हप्त भरणेसाठी अर्थसहाय्य करणे.
सन 2022-2023 या वर्षात अनु. जाती व नवबौद्ध घटकाच्या वस्तीचा विकार करणे या योजने अंतर्गत मंजूर कामे.
संपर्क: